धडगाव:-आजीवन अध्ययन व विस्तार विभाग क. ब. चौ. उ.म.विद्यापीठ जळगांव आणि महाराज ज.पो. वळवी कला, वाणिज्य व श्री. वि कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने धनाजे बुद्रुक येथे एक दिवसीय “वनभाजी महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते.
वनभाजी महोत्सवात एकुण 75 भाज्यांची मांडणी करण्यात आली होती. यात बावीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदिवासी महिलां सोबत बिगर आदिवासी महिलांनीही यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे दोन पुरुष स्पर्धकांनीही आपली पाक कला व भाजीसाठी वापरल्या जाणार्या वनस्पतींचे संकलन मांडुन सहभाग नोंदविला. रानभाज्यांची चव आणि बनविण्याची पध्दती या विषयीच्या माहितीने मान्यवर प्रभावित झाले . वन भाज्यांच्या रेसीपि यांचे ज्ञान हे लिखीत स्वरुपात जतन झाले तर ते जगासाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन कबचौ उमवि जळगांव येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रो. डाॅ आशुतोष पाटील यांनी केले.जिजामाता महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. हिरालाल पाटील यांनी वनभाज्यांची परंपरा टिकविण्याचे आवाहन परिसरातील जमलेल्या नागरिकांना केले. जेष्ठ नागरिक जात्र्या पावरा यांनी वनभाजीची ओळख व त्याची उपयुक्तता या विषयी स्वत:चे अनुभव सांगितले. वनभाज्या व आदिवासी संस्कृती यांचा सहसंबंध अदिम काळा पासून आहे पण आधुनिक जीवन शैलीत तो लोप पावत चाललाय असे प्रतिपादन विठ्ठल कदम यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमास आ.सा शि प्र मंडळाचे अध्यक्ष हेमंत वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच विजयाताई पावरा, उपसरपंच सेवीबाई पावरा, माजी सरपंच डाॅ करमचंद पावरा, विद्यापीठ प्रतिनिधी सुभाष पवार यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. वनभाजी प्रदर्शनीत सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांनी तर संयोजन प्रा अनिल शिंदे यांनी केले. भरत पावरा, सुनिल परमार, अशोक पावरा, जितेंद्र पावरा ,दिनेश पावरा, चंद्रासिंग पावरा, खंडु पावरा,हर्षल शिंदे, राकेश पावरा, दिलवरसिंग महाराज, रतिलाल पावरा आदिंनी संयोजन सहाय्य केले.