धर्मपरिवर्तनासाठी विरोध केल्याने कट्टरपंथीयाचा युवतीवर अमानुष अत्याचार

लखनऊ : हिंदू मुलीला धर्मपरिवर्तनासाठी कट्टरपंथी सामाजाच्या युवकाने दबाव आणला होता. यावेळी युवतीने धर्मपरिवर्तनासाठी विरोध केल्याने युवतीवर अमानुष अत्याचार करण्यात आले. उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीचे नाव फिरोज खान असून त्याने पीडितेवर अमानुष आत्याचार केले. कुटुंबियांनी घडलेल्या प्रकरणाचा आरोपीला जाब विचारला असता आरोपीने पीडितेच्या आई-बाबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीच्या आधारे कट्टरपंथी आरोपीविरोधात एफआरआय दाखल करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील कौशंबी येथील मांझनपूर पोलीस ठाणे हद्दीतील ही धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांची १६ अल्पवयीन मुलगी सोमवारी ६ वाजता शेतात शौच करण्यासाठी गेली होती. गावातील रहिवासी असलेला फिरोज त्याठिकाणी आला. त्यावेळी त्याने पीडितेवर अमानुष अत्याचार केले. त्यावेळी पीडितेने घडलेल्या घटनेप्रसंगी विरोध केला, मात्र त्यावेळी आरोपीने धमकावले.

फिरोजने अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाशी छेडछाड केली. यानंतर पीडितेने आरडाओरड करायला सुरूवात केली. त्यावेळी घटनास्थळी असलेली आजूबाजूची लोकं जमा होऊ लागली. लोकं घटनास्थळी येत असल्याचे पाहून फिरोजने घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने घरी गेल्यानंतर आपल्या कुटुंबियांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. फिरोज अनेक दिवसांपासून पीडितेचा छळ करत होता, असे पीडितेच्या कुटुंबात तक्रारदाराने म्हटले आहे.

त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पुढे सांगितले की, त्यांनी फिरोज याआधी घरी आला होता याविरोधात तक्रार केली होती. मात्र याचा फिरोजवर कोणताही एक परिणाम झाला नाही, याउलट फिरोजची आई नगमा बेगमआणि वडील मोहम्म रझा यांनी पीडितांना सांगितले की, तुम्ही लोकं पळून जा नाहीतर ते तुम्हाला ठार मारतील. तक्रारीच्या शेवटी आरोपीच्या वडिलांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५ (१), ३५२ आण ३५१ (२) आणि ३५१ (२) पोस्को कायद्यांतर्ग गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी फिरोजला १९ ऑक्टोबर रोजी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.