हिंदू हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक सुसंस्कृत पद्धतसुद्धा होय. अशी व्याख्या विचारवंतांनी केलेती आहे. सनातन धर्म अतिप्राचीन असून, प्राचीन काळात भारत एक पुढारलेला देश होता. भारतीय संस्कृतीचा पापा विज्ञानावर आधारित असल्याचे नत्याने सांगण्याची गरज नाही. ज्याकाळी पाश्चात्त्यांना कपडे घालायचीही चाड नव्हती तेव्हाच भारतीयांनी अध्पात्यासह विज्ञानातही भरारी घेतली होती. त्यामुळेच भारतीय अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे महान शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम सांगायचे. डॉ. होमी भाभा यांनी भास्ताच्या अणुपुगाची पापाभरणी केली आणि डॉ. अब्दल कलाम यांनी त्यावर कळस चढविला.
भारतीय ऋषी-मुनी केवळ अध्यात्मातच पारंगत नव्हते, तर विज्ञानातही
त्यांचा वरचष्मा होता. ब्रह्मांडाला वेळेची गती लागू होत नाही; हे आज विज्ञानाने सिद्ध केले आहे. अर्थातच ब्रह्मांडात जेव्हा एक दिवसाचा काळ तोटतो तेव्हा पृथ्वीवर कितीतरी वर्षे उलटून गेलेली असतात. ही बाब मात्र भारतीयांनी प्राचीन काळातब सिद्ध केलेली होती. तसे अनेक दाखले हिंद धर्मग्रंथांमध्ये आढळतील. मानधाता नावाचा राजा अयोध्येत राज्य करायचा. त्याने ऋषी-मुनींच्या विज्ञानाचा लाभ घेऊन सपूर्ण भूतलावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ही बाब देवगुरू बृहस्पती ॐ यांनी इंद्राला पटवून दिल्यानंतर इंद्राने राजा मानधाताशी पुद्ध टाळले होते. लवणासुराचा वध करण्याची जबाबदारी जेव्हा प्रभू समाने शत्रुघ्नावर सोपविली तेव्हा मानधाताचा उल्लेख रामायणात आला आहे.
श्वापेनहावर हा जर्मन तत्त्ववेत्ता बायबलला जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानायचा परंतु, जेव्हा त्याने वैदिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तेव्हा त्याने हजारो वर्षापूर्वीच भारतीयानी अध्यात्मासह विज्ञानातही यश मिळवित्याचा निष्कर्ष काढला आणि शेवटी त्याने बायबलचे मूळ वैदिक तत्त्वज्ञानातव असत्याचे ठासून सांगितले. १९०९ पर्यंत झाडाझुडपांमध्ये जीव असतो, हेसुद्धा जगाला ठावूक नव्हते. भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी झाडाझुडपांनाही जीव असतो, हे सोदाहरण सिद्ध केले. पासाठी त्यांना आपला प्राणसुद्धा डावावर लावावा लागला, भारताच्या कुठल्याच परंपरेचे मूळ अंधश्रद्धेत नाही. परंतु, कातांतराने खुळचट समजुती चिकटल्या आणि या देशाची अपरिमित हानी झाली.
हिंदू आपल्या घरासमोर आजही तुळशीच्या रोपट्याची पूजा करतात. तुळशीचे रोपटे बहुगुणी आहेत. या रोपट्यातून सदैव प्रागवायू झरतो. आता भारताने सर्वच अंगांनी कात टाकली आहे. भारताची अंतराळ संशोधन संस्था इथोने संपूर्ण जगात मापला दबदबा निर्माण केला आहे. डीआरडीसो ही संस्थासुद्धा भारताचे संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. शेकडो वर्षांची मरगळ झटकून देश विकासाच्या दिशेने अग्रेसर झालेला आहे. देशाची ऊर्जितावस्था सुरू झाली असून, स्वामी विवेकानंदाचे स्वप्न पूर्ण करण्पाची जबाबदारी आधुनिक पिढीवर येऊन पडली आहे.
जीवनवाहिनी गंगेचे पाणी भारतीय खूप पवित्र मानतात. आज गंगा दूषित झाली असती तरीही तिथे सत्व आणि तत्त्व मात्र कमी झालेले नाही. अमेरिकन विचारवंत मार्क ट्वेन पाने १८९६ मध्येच गंगेच्या पाण्याचे मूल्यमापन करून भारतीयांच्या आस्थेचा पुरस्कार केलेला आहे. भारतीय अध्यात्माने मोक्षप्राप्ती हे एकमेव उद्दिष्ट मनुष्य जीवनाचे मानले आहे भारतीयांचा दृष्टिकोन विश्वकल्याणाचा आहे. त्यामुळेच विश्वगुरू होण्याचा अधिकार फक्त भारताला प्राप्त आहे. संपूर्ण जग भौतिक सुखासाठी झटत असताना ज्ञानेश्वर माउलीने विश्वकल्याणाची मागणी ईशक्रापुढे केली आहे. ही भारतीयाच्या हृदयाची विशालता होय. प्रभू श्रीराम हे भारतीयांचे आराध्य दैवत. प्रभू श्रीरामासास्खा युगपुरुष जगात झालेला नाही. म्हणूनच त्यांना पुरुषोत्तम म्हणून गौरविले जाते.
अशा पा पुगावतार प्रभू रामाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प संपूर्ण भारतीयांनी केलेला आहे. प्राचीन काळात भारत इतका समृद्ध होता, की सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकविण्याची सुविधा ऋषी-मुनींनी उपलब्ध केलेली होती. मोठमोठी शैक्षणिक विद्यापीठे त्यावेळी भारतात अस्तित्वात होती. ही परंपरा आपल्यापर्यंत येऊन ठेपली आहे. आता पुन्हा त्याच दिशेने मार्गक्रमण करण्याची जबाबदारी आधुनिक पिढीची आहे. भारत जेव्हा विश्वगुरूपदी आरूढ होईल तेव्हा संपूर्ण जगाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.
पुंडलिक आंबटकर
९८८१७१६०२७