धाडसी वृत्तीला सलाम! मुलीच्या प्रसंगावधानाने वाचले मुख्याध्यापक पित्याचे प्राण

तळोदा : शहरातील नेम सुशील प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या योगिनी सुनील परदेशी या विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे याच शाळेतीलच मुख्याध्यापक तथा योगिनीचे वडील यांचा प्रसंगावधाने प्राण वाचला.

 

नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक सुनील परदेशी घरी आले. घरात वीजपुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे त्यांनी इन्व्हर्टरच्या स्वीचला तपासून बघितले. तेव्हा अचानक त्यांचा स्पर्श विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला झाला अन् विजेचा जोरदार धक्का त्यांना बसला. यावेळी सुदैवाने घरात घरात मुलगी योगिनी व त्यांची पत्नी तसेच आई होती. परंतु वीज प्रवाहातून त्यांना सोडवावे कसे हा प्रश्न पडला होता? त्यांना सोडवण्यासाठी आई व पत्नी यांनी अतोनात प्रयत्न केले, परंतु हतबल व्हावे लागले.

शेवटी त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नात आई व पत्नीदेखील त्यांच्या संपर्कात आल्या. परंतु त्यांना स्पर्श करताच एकमेकांना विजेचा जबर 1 धक्का बसत होता. शेवटी योगिनीच्या अभ्यासू व कल्पकतेला सलाम म्हणावा लागेल, लगेच तिने घरात असलेला लाकडी स्टूल आणून वीजप्रवाह करणाऱ्या वायरीच्या दिशेने सरकवत ती वायर बाजूला सारली. अवघ्या सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या योगिनीने आपल्या पित्याचे प्राण आपल्या अभ्यासू वृत्तीने वाचवले असंच म्हणावं लागेल. वेळ आली होती पण काळ योगिनीने रोखून धरला होता. आपल्या ज्ञानाच्या जोरावर व प्रयत्नांनी पित्याला गतप्राण होण्यापासून रोखले. ही घटना जेव्हा परिसरातील नागरिकांना शाळेतील शिक्षकांना समजली तेव्हा लगेच सर्वांनी परदेशी यांच्या घराकडे धाव घेतली व परिस्थिती जाणून घेतली.

यावेळी परिसरातील नागरिक व नेम सुशील विद्यामंदिरातील शिक्षकांनी योगिनीच्या प्रसंगावधानाचे भरभरून कौतुक करत तिचे अभिनंदन केले. तिच्या धाडसी वृत्तीला सर्वांनी सलाम केला. आज संपूर्ण शहरात तिच्या या असामान्य कार्याबद्दल शहरात गौरवपूर्ण चर्चा होत