Dhule : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तींने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने, हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहे.
जिल्हादंडाधिकारी गोयल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये नमूद केल्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, लाऊडस्पिकर वापरण्यावर निवडणुक प्रक्रिया पूर्णहोईपर्यंत निर्बंध घालीत असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे.