धुळे : शहरात कॅफेआड प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तीन ठिकाणी छापेमारी करीत कॅफेचालकांवर कारवाई केली तर आठ प्रेमी युगुलांना कायदेशीर समज देत त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येवून तंबी देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, योगेश राऊत, अमरजित मोरे, बाळासाहेब सूर्यवंशी, दिलीप खोडे, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप पाटील, हेमंत बोरसे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रल्हाद वाघ, चेतन बोरसे, जितेंद्र वाघ, प्रशांत चौधरी आदींच्या पथकाने केली.
कॅफेआड सुरू होते चाळे
देवपुरातील वाडीभोकर रोडवरील द क्रश कॅफे, बॅक बेंचर कॅफे व ट्रेल टेबल कॅफे येथे पथकाने छापा मारल्यानंतर आठ युगूल अश्लील कृत्य करताना आढळल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पालकांना कळविण्यात आले. अश्लील चाळे करून देण्यासाठी तासाप्रमाणे 200 ते 300 रुपये प्रमाणे पैसे आकारले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. तरुणींच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांनी पाल्यांची काळजी आणि लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले. तंबी दिल्यानंतर संबंधित तरुण व तरुणींना पालकांच्या स्वाधीन केले. संबंधित सर्व कॅफेमालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.