ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान…!

राजकीय पक्षांच्या सद्य स्थितीबाबत बन्याच चर्चा रंगत असतात. गुळाला मुंगळे चिकटतात… त्याचप्रमाणे सत्तेबाबत राजकीय नेते मंडळींची कल्पना असते. पूर्वी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानणारे कार्यकर्ते होते. आज ही परिस्थिती कमीच. तीच स्थिती नेते मंडळींची पक्षाकडे सत्ता नाही ना मग मार उडी… उमेदवारी दिली नाही ना मग मास उडी… अशी स्थिती जवळपास सर्वच राजकीय पक्षांमध्ये दिसून येते. पूर्वी भाजपत यायला कोणी तयार होत नसे. लोकसभेत केवळ दोन खासदार असत… आज बहुमत घेऊन हा पक्ष वाटचाल करतोय… मात्र भविष्यातील काही समिकरणे लक्षात घेऊन काही तडजोडी कराव्या लागत आहेत. यात निष्ठावंतांवर अन्याय होताना दिसतो.

याबाबत नाराजीचा सुरही बऱ्याच ठिकाणी आळवला जातोय. वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार होताना दिसतात…तेही कार्यकत्यांच्या समजूती काढतात… यात काही जण शांत बसतात तस काही जण बंडाचा झेंडा हाती घेतात. शिवसेनेत झाले तोच कित्ता राष्ट्रवादीत गिरवला गेला. काकाने ऐकले नाही म्हणून पुतण्याने वेगळी चुल मांडली… उद्धव ठाकरेंच्या मनमानीला तर दादव नाही. ‘

मी आणि माझे कुटुंब ही संकल्पना घेऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत गेल्याने खरा शिवसैनिक भडकला… उठाव झाला आणि स्व. आनंद दिर्धेचा वारसा चालविणारे एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला… तरीही उद्धवसाहेब ऐकायला ऑजळ पाणी पिण्यास घेतली आणि आता काळे पाणी दिसतेय. एक-एक जण बाजुला होतोय तरी भान नाही. हिंदुत्वाला तिलांजली दिली… असंगाशी संग केले… त्याचे परिणाम आता भोगतायं… भविष्यात काय वाताहत होणार हे तो ‘संजय’ही सांगू शकणार नाही. आज राज्यातील प्रत्येक गावातील राष्ट्रवादी व शिवसेना (उबाठा) गटातील कार्यकर्ता अस्वस्थ आहे. सर्वत्र अविश्वासाचे वातावरण या दोन पक्षांमध्ये आहे.

काँग्रेसबाबत तर न बोललेलेच बरे…! जळगाव जिल्ह्यात एक आमदार आहे तोही पक्षापेक्षा स्वकतृत्वाने निवडून आलेला… त्यांच्याबद्दलही बरेच बोलेले जाते… भविष्यात तेपणा भक्कम आधार शोधतील अशी चर्चा आहे. मग शिल्लक कोण…! तर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष. गत काळात मध्य प्रदेश, राजस्थानसह ज्या राज्यात निवडणूका झाल्या तेथे भाजपने यश मिळविले. पक्ष जेव्हा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली त्यावेळी सर्वांनाचा धक्का बसला… परिवारात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना या पक्षाने संधी दिली. कुणाला राग… कुणाचा संताप याची पर्वा न करता निर्णय झाले आणि काम करणाऱ्याला संधी दिली गेली.

ध्येयनिष्ठ कार्यकत्याँचा सन्मान झाला. तीच परिस्थिती जळगाव लोकसभा मतदार संघाबाबत झाली. मतदार संघातून प्रस्थापित नावांना बाजूला ठेऊन पक्षाने एकनिष्ठता कार्यकर्त्या असलेल्या माजी आमदार स्मिता वाघ यांना संधी दिली. या उमेदवारीबद्दता अनेकांना धक्का बसला… ! विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारण्यामागे अनेक कारणे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी पक्षाचे निरीक्षक आले, केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे नेते अमित शहा आले त्यावेळेसच बरेच चित्र स्पष्ट झाले होते. स्मिता वाघ यांना १९१९ च्या लोकसभा निवडणूक काळात लोकसभेची उमेदवारी मिळाली प्रचार रंगात आला असताना त्यांना थांबवून उन्मेश पाटील यांना उमेद्वारी दिली गेली.

मात्र उन्मेश पाटील उमेदवारी दाखल करीत होते, त्यावेळी स्मिता वाघ या हजर होत्या. यालाच म्हणतात पक्षनिष्ठा. विद्यार्थी परिषदेच्या मुशितून घडलेल्या कार्यकर्त्या असलेल्या स्मिता वाघ यांनी तो धक्का सहन केला व काम करत राहिल्या. त्या कामाची पावती यावेळी पक्षाने त्यांना दिली. आजच्या राजकीय पक्षांच्या वाटचालीचा विचार करता आयाराम -गयाराम सुरूच रहाणार… पण ध्येयनिष्ठांना न्याय द्या…. अन्याय करा… ते हटत नाही… डगमगत नाही… येथे तिच प्रचिती आली. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने सर्वसामान्य कार्यकर्ता सुखावला आहे. तो म्हणतोय… ‘देर है… अंधेर नहीं….. असे अनेक जण बोलताना दिसतात