नंदुरबार : गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ तेआऊटचे काम सुरु असलेल्या ठिकाणी २० रोजी सायंकाळच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी धिरज ऊर्फ महेंद्र दिलीप भोई वय २६ या तरुणाचा खून करुन पळाले होते. स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी सुरत येथून संशयित आरोपी यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी वय-१८, जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील वय-२० यांना बेड्या ठोकल्या आहेत.
शहादा येथील खूनाचा तपास ४८ तासाच लागत्याबरोबर नंदुरबार शहरातील महेंद्र दिलीप भोई ह्या तरुणाचा झालेल्या खूनाचा तपास लागला आहे. यात २४ तासात संशियत आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक २१ रोजी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एप्स यांना माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील नवनाथ नगर परिसरात राहणारा गौरव सोनवणे (चौधरी) याने व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने हा खून केला. तो सध्या खांडबारा परिसरात पळून गेलेला आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले. पथकाने संशयीत गौरव सोनवणे (चौधरी) यास खांडबारा येथे ताब्यात घेतले.
त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. ते बाहेर राज्यात पळून गेल्याचे सांगितले. एक पथक गुजरात राज्यात रवाना झाले व गौरव सोनवणे याने दिलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही संशयीतांना सुरत येथे ताब्यात घेतले. यज्ञेश ऊर्फ यश हरीष चौधरी (वय-१८), जयवंत ऊर्फ जयेश गणेश पाटील (वय-२० दोन्ही रा. नवनाथ नगर, नंदुरबार) असे आहे. तसेच गुन्हयातील त्यांचा एक साथीदार गौरव रोहिदास खेडकर (भोई) (वय-२० रा. जूनी भोई गल्ली, नंदुरबार) यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांनी सदरचा खून पुर्व वैमनस्यातून कट रचून केल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोह राकेश वसावे, पो. ना. राकेश मोरे, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, पो.शि. विजय ढिवरे, अभय राजपुत, आनंदा मराठे, यशोदिप ओगले, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पो.ह. सुनिल येलवे, भटू धनगर, किरण
मोरे यांनी केली