---Advertisement---

नंदुरबारला २६ वर्षीय युवकांचा डोक्यात दगड घालून निघृण खून

by team
---Advertisement---

नंदुरबार : अज्ञात कारणातून एका २६ वर्षीय युवकांचा डोक्यात दगड घालून व तोंडावर चाकूने वार करून निघृण खून झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी एका संशयीताला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनोळर्खीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गोल्डन सिटी पार्कच्या मागे नवीन वसाहती जवळील टेकडीवर एका २६ वर्षीय युवकाचा बुधवारी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान निघृण खून झाल्याची घटना घडली आहे. शहरातील संजय नगर गवळीवाड्यात राहणारा धीरज उर्फ महेंद्र दिलीप भोई (वय २६) या युवकाचा खून झाला आहे. अज्ञात कारणातून अनोळखींनी धीरज ऊर्फ महेंद्र दिलीप भोई यांच्या डोक्यात दगड घालून व तोंडावर चाकूने वार करीत जीवे ठार मारले.

याबाबत कृष्णा दिलीप भोई यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत. दरम्यान याप्रकरणी एका संशयीताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment