नंदुरबारातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात पाऊणेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नंदुरबार :  शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या करून फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देम ाल हस्तगत करण्यात यश आले आहे. १९ रोजी दाखल गुन्ह्यात आरोर्पीनी ३,१०,६०० रु. किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच २० रोजी दाखल गुन्ह्यात आरोपींनी १,७०,००० रु. किमतीचा मुद्देम ाल चोरुन नेला म्हणून दोन्ही गुन्ह्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा नोंदविण्यात आला होता.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सपोनि संजोग बच्छाव यांना तत्काळ गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले. गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना बातमी मिळाली की, एकता नगरात राहणारा शरद अरुण चव्हाण उर्फ पवन गोंधळी व त्याच्या साथीदारांनी मिळून हा गुन्हा केलेला असून तो सध्या पळून गेला आहे,

अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पथकाने संशयित आरोपी शरद चव्हाण उर्फ पवन गोंधळी यास ताब्यात घेऊन त्याचे साथीदार हरपालसिंग ओंकारसिंग सिकलीकर व त्याचा भाऊ समशेरसिंग ओंकारसिंग सिकलीकर दोन्ही रा. एकता नगर यांच्या मदतीने माहिती दिली. तसेच त्यांनी चोरी केलेला एकूण ३ लाख ५० हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. या दोघांनी मिळून केला असून ते काळ्या रंगाच्या मोटारसायकलने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे
पथकाने सापळा रचला.