नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते चकाकणार

नंदुरबार: तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांसाठी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याने शासनाने 24 कोटी 20 लाखांच्या निधी मंजूर केला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहनांचा वाढता भार लक्षात घेता दुरुस्ती, मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी निधीच्या उपयोग केला जाणार असून, ग्रामीण भागातील रस्ते आता चकाचक होणार आहेत.शिवसेनेचे नेते तथा माजी

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदनाद्वारे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महायुती शासनाने मागणीची दखल घेत 24 कोटी 20 लाख रुपयांच्या निधी मंजूर केला. त्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील गावांसाठी 19 कोटी 60 लाख तर आदिवासी क्षेत्रातील गावांसाठी 4 कोटी 60 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत यांनी आभार व्यक्त केले. यासह अन्य रस्त्यांच्या समावेश-  कोपर्ली ते कांड्रे  रस्त्यासाठी 60 लाख,बह्याने ते आराळे रत्यासाठी 40 लाख, कोपर्ली ते शेल्टी रत्यासाठी 1 कोटी कार्ली ते कांड्रे रस्त्यासाठी लाख 40 लाख, जूनमोहिदा ते तिसी स्टेशन 80 लाख, न्याहली, बलदाणे,भादवड सतुरखे रस्त्या 1 कोटी, ईजिमा 54 ते

मालपूर रस्ता 75 लाख, तलवाडे ते नंदुरबार तालुका हद्दिस मिळणारा रस्ता 75 लक्ष, होळ ते तीसी स्टेशन रस्ता 75 लाख, आसाणे ते ठेलारपाडा रस्ता 50 लाख, नंदुरबार तालुक्यातील प्रजिमा- 17 ते सैताने रस्ता 25 लाख, घोताणे ते आसाने रस्ता 30 लाख, तलवाडे बू.ते प्रजिमा – 54 ला मिळणारा रस्ता 50 लाख , रनाळे ते रजाळे रस्ता 50 लाख, रनाळे ते धंडाणे 1 कोटी रस्ता, रनाळे ते धंडाणे रस्त्यावर चार स्लेबड्रेन बांधणे 90 लाख. यासह अन्य रस्ते कामांच्या समावेश आहे.