---Advertisement---
प्रचाराची रणधुमाळी संपली,
पंतप्रधान मोदी ध्यान धारणेसाठी कन्याकुमारीमध्ये.
मोदींच्या दौऱ्यावर कुणाकुणाच्या प्रतिक्रिया?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे पासून विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यानधारणा करण्यासाठी जात आहेत. यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. काँग्रेसने बुधवारी २९ मे रोजी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. पंतप्रधान ३० मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे जाणार आहेत जेथे ते ध्यान करतील. १ जून रोजी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी पंतप्रधानांचा हा कार्यक्रम आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हे असे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही एकतर प्रचार करत आहात किंवा स्वतःचे प्रसारण करत आहात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान धारणेवरुन विरोधकांनी मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. याला इत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस वरती हल्लाबोल केलाय. एवढा मोठा प्रचार केल्यानंतर ध्यानधारणा करणं चुकीचं आणि बेकायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित करत कांग्रेस पुन्हा एकदा मुखर्पणा करत असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. काँग्रेस आमच्यासाठी पाकिस्तान मधून शिव्या आयात करत असून काँग्रेस जिंकण्यासाठी पाकिस्तानमध्ये पूजाअर्चा केल्या जात असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय. मोहब्बत की दुकानात आता फक्त शिव्या शिल्लक असल्याची टीका त्यांनी करत दोन दिवसांपासुन संजय निरुपमांनी कांग्रेसवर हल्लाबोल सुरु केलाय…..
३० मे रोजी पंतप्रधानांनी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ध्यानसाधनेची सुरुवात केली. त्या क्षणापासून १ जून रोजी सायंकाळपर्यंत त्यांची ही साधना सुरु राहणार आहे. ज्या शिळेवर स्वामी विवेकानंद यांनी बसून ध्यानसाधना केली होती त्याच शिळेवर बसून पंतप्रधानही ध्यानधारणा करत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
कसा असेल हा ४५ तासांचा काळ?
ध्यानधारणेच्या या संपूर्ण सत्रादरम्यान पंतप्रधान काही नियमांचं पालन करत असून, यादरम्यान ते फक्त द्रव्य पदार्थांचं सेवन करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ते नारळपाणी आणि द्राक्षांचा ज्यूस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संपूर्ण अध्यात्मिक प्रवात पंतप्रधान मौन राहत असून, ध्यान कक्षातून ते बाहेर येणार नसल्याचं सांगितलं जात आहे.