जळगाव : शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरू झालेली असून काही कामे पूर्ण झाली आहेत. अशा पूर्ण झालेला रस्ता फोडून जर नळ संयोजने – घ्यायचे असेल तर प्रती। मिटर साडेसहा हजार रूपये मोजावे लागणार आहेत.शहरातील अनेक भागांमध्ये 7 नवीन रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. यात काही ठिकाणी डांबरी तर काही भागांमध्ये काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत २ आहे.
मात्र, महापालिकेने वांरवार २ आवाहन केल्यानंतर देखील काही नागरिकांनी अमृत योजनेचे नळ कनेक्शन घेतलेले नाही. रस्ते – झाल्यानंतर अशा नागरिकांकडून महापालिकेकडे नळ कनेक्शन मिळावे, याकरीता अर्ज करण्यात येत आहेत. सदर अर्ज करणाऱ्या नागरिकांना नळ कनेक्शन देण्यासाठी नवीन झालेले रस्ते फोडावे लागणार आहेत. म्हणून महापालिके च्या पाणी पुरवठा विभागाकडून संबधित नागरिकांना ६ हजार ५५७ रुपये प्रति मीटर दंड आकारणी करण्यात येत आहे.नवीन रस्ता खोदण्यात येवू नये म्हणून महापालिकेने शहरातील नागरिकांना आपआपले नळ कनेक्शन जोडणी करून घेण्याचे आवाहन केले होते.यासंदर्भात जाहीरात व बातमीच्या माध्यमातून लोकांना नळकनेक्शन घेण्याविषयी सांगण्यात आले होते. परंतु तरीही थकबाकीदारांची झाली फजिती शहरात अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचे ९६ टक्के काम पुर्णत्वास आले असून आता शहरात एक एक झोन अमृत योजनेचा सुरु करण्यात येत आहे.
त्यामुळे त्या त्या झोन मधील जुनी जलवाहीनी बंद केली जात आहे. अमृत योजना सुरु होण्यापुर्वी सर्व नागरिकांनी आपआपले नळ कनेक्शन जोडून घेण्यासाठी पाणीपट्टी व मालमत्ता कर भरून घ्यावा, अन्यथा नळ कनेक्शन दिले जाणार नाही असे मनपा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु तरी, काही थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्यामुळे त्यांना अमृत योजनेचे कनेक्शन दिले गेले नाही, आता अशा थकबाकीदारांची चांगलीच कोंडी झाली असून जुनी जलवाहीनी बंद झाल्यामुळे पाणी मिळत नसल्याने त्यांच्याकडून अमृत कनेक्शन जोडणीची मागणी केली जात आहे. अशा थकबाकीदारांना थकबाकी तर भरावीच लागणार आहे, पण अजून रस्ता फोडण्याचा दंड देखील लागणार आहे.काही नागरिकांनी आपाआपले नळ कनेक्शन जोडून घेतले नाही. याच दरम्यान, महापालिकेने जुनी जलवाहीनी बंद करून अमृत योजने अंतर्गंत टाकण्यात आलेली नवीन जलवाहीनी सुरु केल्यामुळे बऱ्याच नागरिकांचे पाणी बंद झाले. त्यामुळे काही नागरिकांनी मनपात धाव घेवून अमृत योजनेचे नळकनेक्शन जोडण्यासाठी अर्ज केले. मात्र, आता जर त्या भागात नवीन रस्ता झाला असेल तर, त्या नागरिकांना ६ हजार ५५७ रुपये मीटर प्रमाणे पैसे भरावे लागणार असून त्यानंतरच त्यांना नळ कनेक्शन दिले जाणार असल्याचे धोरण महापालिकेने राबविले आहे.