नवरात्रौत्सव: अवघ्या काही दिवसांवरती आता नवरात्रौत्सव आला आहे. अश्यातच नवरात्रौत्सवात भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात.आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशभरातून भाविक धाराशीवमध्ये येतात.तुळजाभवानी देवीच्या भाविकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.तुळजाभवानी देवीच्या पूजा व दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.
नवरात्रौत्सवात पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी उघडे ठेवले जाणार आहे.१३ आणि १४ तारखेला भवानी ज्योत येणार आहे.तसेच १५ ते २४ ऑक्टोबर नवरात्रौत्सव असल्याने तसेच 28 ते 30 ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा असल्याने वेळेत बदल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिर रात्री ११ वाजता बंद केले जाईल आणि सकाळी १ वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनासाठी उघडले जाणार आहे.अभिषेक आणि पूजा सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत पूर्ण होणार आहेत तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने याबाबत जाहीर नोटीस काढण्यात आली आहे.