---Advertisement---

नवाब मलिकांच्या जावयाच्या कराचा भीषण अपघात; ICUमध्ये उपचार सुरू

by team
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. अपघातावेळी समीर खान यांच्यासोबत पत्नी निलोफरसुद्धा होत्या. त्यांच्या हाताला दुखापत झालीय.समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते आय़सीयूमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटना काय?
समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघेही घराजवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. चेकअप झाल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर आले. तेव्हा समीर यांनी कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय ३८) याला गाडी आणायला सांगितलं. तेव्हा चालकाने गाडी आणत असताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबला. यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यात समीर खान यांना मल्टिफॅक्चर झाले आहेत.

त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आले असल्याची माहिती समोर आलीय. सध्या समीर हे आय़सीयूमध्ये असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांना काही काळ अंडर ऑब्जर्वेशन ठेवलं जाईल. या प्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment