नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला ‘या’ छोट्या बचत योजनांवर इतके मिळेल व्याज

2023-24 हे आर्थिक वर्ष संपून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या तिमाहीसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित केले आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही, असे सरकारने 8 मार्च रोजीच जाहीर केले होते.

पीपीएफवर मिळेल इतके व्याज
वित्त मंत्रालयाने 8 मार्च रोजी या विषयावर अधिसूचना जारी करून माहिती दिली होती की आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून दरम्यान लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. अशा परिस्थितीत, ग्राहकांना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) वर 7.1 टक्के व्याजदर मिळत राहतील.

विविध लहान बचत योजनांवर व्याज
पोस्ट ऑफिस बचत खाते – ४ टक्के
पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना – ६.९ टक्के ते ७.५ टक्के व्याजदर
आरडी योजना – 6.7 टक्के
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) – ८.२ टक्के
मासिक उत्पन्न योजना (MI.4 टक्के
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) – 7.7 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) – 7.1 टक्के
किसान विकास पत्र (KVP) – 7.5 टक्के
सुकन्या समृद्धी योजना (SSY)-8.2 टक्के