भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉकरसंबंधी नवीन निर्देश दिले आहेत. हा नियम 1 जानेवारी 2023 रोजी पासून लागू होईल. या नवीन नियमांनुसार, हे नियम लागू झाल्यानंतर जर लॉकरमधील वस्तू, कागदपत्रे यांचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे. बँक आणि ग्राहकांमध्ये लॉकरसंबंधीचा करार करण्यात येईल. हा करार 31 डिसेंबरपर्यंत वैध राहील.
केंद्र सरकारने जीएसटीच्या ई-इन्वॉयसिंगची मर्यादा 20 कोटी रुपयांहून कमी करुन ती आता पाच कोटी रुपये केली आहे. जीएसटीच्या नियमात हा बदल 1 जानेवारी 2023 रोजीपासून लागू होईल. ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटी अथवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना आता ईलेक्ट्रॉनिक बिल जनरेट करणे आवश्यक आहे.
दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. या वर्षी मे महिन्यापासून डिसेंबरपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव कायम राहिले. हे भाव स्थिर आहेत. त्यामुळे येत्या 1 जानेवारी 2023 रोजीपासून काय बदल होतील हे लवकरच स्पष्ट होईल.
बँक आणि ग्राहकांमध्ये लॉकरसंबंधीचा करार करण्यात येईल. हा करार 31 डिसेंबरपर्यंत वैध राहील. बँका लॉकरसंबंधीची माहिती ग्राहकांना एसएमएस अथवा इतर पर्यायांद्वारे देईल.