नव व मध्यम वयाचा मतदार निर्णायक

नव व मध्यम वयाचा मतदार निर्णायक लो कसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून महाराष्ट्रात ४८ जागांसाठी पाच ाप्यांत होणाऱ्या मतदानासाठी आयोगाची तयारी झाली आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी आयोग वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे. नवमतदार व मध्यम वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशाची धुरा पाच वर्षांसाठी ज्या सरकारच्या हाती असते, ते सरकार निवडण्यासाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सरकारशी संबंध येतोच. सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा सामान्य व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. अशा या अत्यंत महत्वाच्या निवडणुकीच्या मतदानात सर्वांचा सहभाग असणे तेवढेच आवश्यक आहे गेल्या काही निवडणुकांपासून मतदानाचा टक्का वाढतो आहे. त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. नवमतदार व मध्यम वयोगटातील मतदारांमध्ये उत्साह असल्याने यंदा मतदानाचा टक्का आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हा मतदार राष्ट्र‌हिताच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदाराचा नेमका फायदा कोणाला झाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल, निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांची एकूण संख्या व वयोगटानुसार नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे. सध्या एकूण मतदार ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ आहे.

त्यात ३० ते ४९ वयोगटातील मतदार सर्वाधिक म्हणजे ४० टक्के आहे. १८ ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या ही १.२७ कोटी आहे. त्यात नवमतदार जास्त आहेत, ४० ते ८० क्योगटातील मतदारांची संख्या मतदारयादीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. मतदारयादीत हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९१७ वरून ९२२ पर्यंत वाढती आहे. १८ ते १९ वयोगटातील तब्बल ६ लाख ७० हजार ३०२ मतदार तर २० ते २९ वयोगटातील ८ लाख ३३ हजार ४९६ मतदार नव्याने जोडले गेले आहेत. ३० ते ३९ वयोगटात एकूण मतदार २ कोटी ७ लाख ९० हजार ७४२ (२२.५९ टक्के) तर ४० ते ४९ वयोगटातील २ कोटी २ लाख ३३ हजार ५०७ (२१.९८ टक्के) मतदार आहे. ५० ते ५९ वयोगटातले एकूण मतदार १ कोटी ५३ लाख ५१ हजार २१७ (१६.६८ टक्के), ६० ते ६९ वयोगटातील एकूण मतदार ९८ लाख १२ हजार २२५ असून त्यांची टक्केवारी १०.६६ आहे. ७० ते ७९ वयोगटातील एकूण मतदार ५३ लाख ३८ हजार २८१ व टक्केवारी ५.८ आहे. ८० ते ८९ वयोगटातले एकूण मतदार २० लाख ९५ हजार ८२२ आहे. हा टक्का २.२८ आहे. ८५ पेक्षा अधिक वयोगटातील मतदार १३ लाख १२ हजार ६२३ आहेत तर १०० वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या ५२ हजार ७६९ आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर १७ ते २२ मार्चदरम्यान तब्बल १ लाख ८४ हजार ८४१ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे.गेल्या दहा वर्षांत तरुण मतदारांमध्ये उत्साह वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. मतदार म्हणूनही त्यांची संख्या वाढते आहे आणि प्रत्यक्ष मतदानातही त्यांचा सहभाग लक्ष वेधणारा आहे.

बहुमतातले स्थिर व निर्णयक्षमता असलेले सरकार सत्तेत असणे हे त्या पाठीमागचे एक प्रमुख कारण आहे. पाउलट राजकीय अस्थिरता असली की निर्णय लवकर होत नाही आणि प्रगतीचा वेग मंदावतो. त्याचा पेट परिणाम पुढच्या मतदानावर होतो. त्याची टक्केवारी कमी अधिक असते आणि परिस्थितीनुसार त्याचे परिणाम असतात. भूतकाळातत्या अनेक निवडणुकांमध्ये ते दिसले. त्यातूनच पुढे सौदेबाजीने एकत्र आलेल्यांचे सरकार देशाने पाहिले आणि अनुभवले. हा इतिहास मतदारांच्या डोळ्यांसमोर असल्याने गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताचे सरकार विराजमान झाले. त्याचे चांगले परिणाम समोर आले असून स्थिर सरकारच देशाच्या हिताचे असते पाची जाणीव मतदारांना झाली आहे. यंदाही सर्वच वयोगटांतले मतदार एक मजबूत सरकार निवडण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान करतील, हा विश्वास आहे.

९४२०७२१२२५