नांदेड : महाराष्ट्रातील नांदेडमध्ये मंगळवारी एका पॅसेंजर ट्रेनला आग लागली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण तपासले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 9.30 वाजता पूर्णा परळी पॅसेंजर ट्रेनला आग लागली. ट्रेनला आग लागली तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभी होती.
उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये अचानक धूर आणि उंच ज्वाळा उठत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाने रेल्वे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. ज्या डब्याला आग लागली तो डबा वापरला जात नव्हता आणि तो सहसा स्पेअर म्हणून ठेवला जात असे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ म्हणाले की, ‘नांदेडच्या मेंटेनन्स यार्डमध्ये उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या सामानाच्या डब्यात आग लागली. आग लागल्यानंतर अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आली असून या अपघातात अन्य कोणत्याही डब्याचे नुकसान झाले नाही.