नांदेड : अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमधे गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये अस्वस्था पसरली होती. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयटीएम कॉलेजमध्ये पार पडलेल्या बैठकी दरम्यान माजी नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर अशोक चव्हाण हे शुक्रवारी पहिल्यांदाच नांदेडला आले होते. त्यानंतर त्यांनी आज समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे ५५ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान अशोक चव्हाण यांनी स्वतः ट्विट करत माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची माहिती देखील दिली. आजच्या या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.