---Advertisement---

नागपूरमध्ये वऱ्हाडीच्या गाडीला भीषण अपघात ; एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू

---Advertisement---

नागपूर । नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत लग्न समारंभ आटोपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाला. मृतकामध्ये दोन सख्या चुलत भावाचा समावेश.

ही भीषण घटना नागपूरच्या काटोल तालुक्यात मध्यरात्री घडली. अपघातात मृत सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. लग्नावरून परतताना त्यांच्या गाडीला

अपघातात मृत सर्व जण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील रहिवासी होते. नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपठार बाजार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी वऱ्हाड नागपूरला गेले होते. शुक्रवारी ते वऱ्हाड परत गावी येण्यासाठी निघाले. मध्यरात्री हे वऱ्हाड परतत असताना ट्रकनं गाडीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. ट्रकच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले. कारमध्ये बसलेल्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यामधील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. काही स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.

या सहा जणांचा मृत्यू
या अपघातात अजय दशरथ चिखले (वय 45), विठ्ठल दिगंबर थोटे (वय 45), सुधाकर रामचंद्र मानकर (वय 42), रमेश ओंकार हेलोंडे (वय 48), मयूर मोरेश्वर इंगळे (वय 26), वैभव साहेबराव चिखले (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामधील अजय चिखले आणि वैभव चिखले हे सख्ये चुलत भाऊ आहे. लग्न आटोपून आनंदात असणारे चिखले कुटुंबियांवर या घटनेनंतर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---