नागपूरात नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन; विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार

नागपूर : काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीने मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज नितीन गडकरी यांनी देखील त्याच ताकदीने शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आज 27 मार्चला नितीन गडकरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या करिता नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्या वतीने संविधान चौक से जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी आपले जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

या करिता स्वत: नितीन गडकारींनी तमाम नागपूरकरांना या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सोबतच मी कुठलेही वाहन पाठवणार नाही, अशी तंबी देखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. असे असताना आज नागपूरच्या संविधान चौकात स्वयमस्फूर्तिने हाजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागपूरकर रस्त्यावर उतरले. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी काल प्रचंड ताकदीने मैदानात उतरत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज नितीन गडकरी यांनी देखील त्याच ताकदीने शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.