---Advertisement---

नाशिक पुणे महामार्गावर चालती शिवनेरी बस पेटली ! सुदैवाने जीवित हानी टाळली

by team
---Advertisement---

जळगाव त.भा.: गेल्या २४ तासापूर्वी पुण्यात शिवशाही बसला आग लागली होती. ह्या घटनेला काही तास उलटत नाही तोच नाशिक पुणे महामार्गावर चालती शिवनेरी बस पेटली . व चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. मात्र या प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आल्यानं सुदैवाने जीवित हानी टाळली आहे .

सविस्तर वृत्त :

नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या शिवनेरी बसने या महामार्गावर अचानक पेट घेतला.नाशिकहून ही बस पुण्याला जात होती. पण अचानक गाडीतून धूर येऊ लागला. त्यामुळे लगेच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. गाडीने पेट घेताच प्रवाशी गाडी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment