नासाकडून मोठा अलर्ट… आज पृथ्वीजवळून जाणार हे धोकादायक स्टिरॉइड्स, पृथ्वीवर काय परिणाम होईल ?

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 10 ऑगस्ट रोजी 2024 KH3 आणि 2024 PK हे दोन स्टिरॉइड्स पृथ्वीजवळून जाऊ शकतात. दरम्यान, पृथ्वीच्या अगदी जवळून जाणाऱ्या या स्टिरॉइड्सचा पृथ्वीवर किती परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या स्मॉल-बॉडी डेटाबेस लुकअपनुसार, स्टिरॉइड 2024 KH3 हा खूप मोठा स्पेस रॉक आहे. तो 11.42 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने धावत आहे. हा वेग 41,125 किलोमीटर प्रति तास इतका आहे. यासोबतच आणखी एक स्टिरॉइड 2024 PK1 पृथ्वीजवळून जाईल. त्याचा आकार 110 फूट आहे. हे स्टिरॉइड पृथ्वीच्या सुमारे 4 दशलक्ष मैलांच्या आत जाईल.

पृथ्वीवर काय परिणाम होईल ?
नासाच्या म्हणण्यानुसार, हे दोघेही ब्रह्मांडाच्या दीर्घ प्रवासावर आहेत. मात्र, यामुळे पृथ्वीला कोणतीही हानी होणार नाही. यापूर्वी काही स्टिरॉइड्स आणि तत्सम काही तुकडे पृथ्वीवर आदळले आहेत. त्यांचा पृथ्वीवर थोडाचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे अवकाश संस्था यावरही लक्ष ठेवत आहे. गरज पडल्यास याशी संबंधित कोणतीही महत्त्वाची पावले उचलली जावीत म्हणून.

दुसरीकडे, भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स नासाच्या मोहिमेवर अंतराळात आहेत. नासाने शुक्रवारी सांगितले की,  अंतराळवीर बॅरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स आता स्पेसएक्सच्या क्रू-9 मिशनमधून फेब्रुवारी 2025 च्या आसपास परत येऊ शकतात. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना अवकाशात जाऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे.

दरम्यान, अलीकडेच नासाने जाहीर केले आहे की, विल्यम्सची परतीची तारीख फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढू शकते. ५ जूनला गेलेले हे अंतराळवीर सात दिवसांनी परतणार होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अंतराळातच राहावे लागले. हे बोईंग स्टारलाइनरचे यश म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.