नासाने शोधली ‘सुपर अर्थ’

वॉशिंटन:  अमेरिकी अंतराळ संस्था नासाने सुपर अर्थ शोधली असून, या ग्रहावर जीवन शक्य असल्याचे नासाने म्हटले आहे. हा ग्रह पृथ्वीपासून १३७ प्रकाश वर्षे दूर आहे. या सुपर अर्थची पुढील माहिती घेतली जात आहे. हा ग्रह एका लहान कक्षेत असून, तो लाल ताऱ्याला प्रदक्षिणा घालत आहे. खगोल शास्त्रीय मानकांचा विचार केल्यास तो आपल्या जवळ म्हणजे १३७ प्रकाशवर्षे दूर आहे. त्याच प्रणालीमध्ये पृथ्वीच्या आकाराचा दुसरा ग्रहही असू शकतो,

असे नासाने म्हटले आहे. या ग्रहाला टीओआय-७१५ बीअसे नाव देण्यात आले आहे आणि तो पृथ्वीच्या सुमारे दीडपट आहे. त्याच्यामूळे ताऱ्याभोवती योग्य कक्षेत तो परिभ्रमण करीत आहे. कदाचित त्याच्या पृष्ठभागावर पाणी असू शकते. तोत्याच्या कक्षेतील भ्रमण

केवळ १९ दिवसांत पूर्ण करतो. म्हणजेच त्याचे वर्ष केवळ १९ दिवसांचे आहे, असे नासाने म्हटले आहे. पृष्ठभागावरील पाण्यासाठी विशेषतः अनुकूल वातावरणासाठी अनेक घटकांचा निश्चितपणे अभ्यास करावा लागले. लहान ग्रह कदाचित पृथ्वीपेक्षा किंचित मोठा असू शकतो आणि तो कदाचित राहण्यायोग्यही असू शकतो, असे नासाने सांगितले. हा ग्रह एका लहान ग्रहाभोवती फिरतो, जो सूर्यापेक्षा लहान आणि थंड आहे.

याप्रमाणे असे अनेक तारे लहान खडकाळ तारे आढळतात. हे ग्रह आपल्या सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती जास्त प्रदक्षिणा करतात. परंतु, येथे लाललहान ग्रह असत्याने आणि तो थंड असल्याने ग्रह जवळ येऊ शकतात, तरी ते सुरक्षित अंतरावर राहू शकतात