ना.गुलाबराव पाटील: निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना प्राधान्य :

जळगाव : आपण नेहमी निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले आहे . घोडा मैदान जवळ येवू द्या- विरोधकांना सभांमधून निरुत्तर करणार आहोत, असे  प्रतिपादन शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पिंपळेसीम येथे पूल व रस्ते व आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण व विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी विरोधक व टीका करणाऱ्यांवरही तुफान फटकेबाजी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्कप्रमुख मनोज हिरवे होते.

प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून, विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात  पिंपळेसीम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करणार आहे. वाघळू बुद्रूक व खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. झुरखेडा-खपाट- पिंपळेसीम हा 10 कोटीचा रस्ता तसेच  पिंपळेसीम ते बोरखेडा हा 5 कोटी रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे, असेही भावनिक  प्रतिपादन ना.गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी अजय रामदास जाखेटे यांनी 2 गुंठ्ठे जागा मोफत दिल्याने त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कामांचे झाले लोकार्पण व शुभारंभ

पिंपळेसीम  येथे3 कोटी 46 निधीतून नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण,डीपीडीसी अंतर्गत 1 कोटी 27 लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण, 81 लाखाची पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, पिंपळेसीम ते हनुमंतखेडा या रस्त्याचे 1.5 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 80 लक्ष निधी मंजूर असून त्या रस्त्याचा शुभारंभदेखील करण्यात आला. यासह इतर एकूण 6 कोटी 96 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे विधिवत पूजन करून पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ॲड. विनोद पाटील, गजानन पाटील, दुध संघाचे संचालक रोहित निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, गोविंदा मोरे, उपसरपंच अरुण पाटील, ग्रा.पं. सदस्य सोपान पाटील अमोल पाटील, अनिल पाटील, नारबा पाटील, वासुदेव पाटील, जगन्नाथ पाटील, मूलचंद पाटील, सुभाष पाटील, हुकूमचंद पाटील, मंगल पाटील, चेअरमन व्हाईस चेअरमन, ज्ञानेश्वर पाटील, भगवान पाटील,  राजू पाटील, शाखाप्रमुख सुनील पाटील, शेतकी संघाचे संचालक गजानन पाटील, मुरलीधर पाटील, चंदू भाटिया, प्रिया इंगळे, सरपंच संघटनेचे सचिन पवार, हुकूम मास्तर, तुकाराम पाटील, मंगल भिका पाटील, हिरालाल पाटील, दगा पाटील यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले, तर आभार उपसरपंच अरुण पाटील यांनी मानले.

2024 लाही गुलाबभाऊ, तुम्हीच : मान्यवरांचा विश्वास 

यावेळी तालुकाप्रमुख डी.ओ.पाटील गजानन पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, सरपंच संघटनेचे सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पी.एम. पाटील व जि.प. सदस्य गोपाल चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  जाती-पातीच्या राजकारणापेक्षा  विकास कामांना महत्व देऊन मतदारसंघाचा कायापालट केला. त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे ते राज्यभर प्रसिद्ध असल्याने त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. गुलाबराव पाटील म्हणजे गोरगरिबांचा व सर्व सामन्यांचा नेता असल्याचे सांगत  सन 2024 व 2029 लाही भाऊ तुम्हीच विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांचे तोंड भरून कौतुक केले.