चोपडा : चोपडा तालुका हे राजकारणासाठी जास्त सुपीक जमीन म्हणून ओळखले जाते. तालुक्यात मागे काय झाले हे विसरून नव्या संचालक मंडळाने काम करावे. टीका करणे हे आपले काम नव्हे आणि आता तर सत्तेत आहोत, त्यामुळे टीका कोणावर करणार हा गंभीर प्रश्न आहे. आगामी निवडणुकीत कोणीच कोणावर टीका करणार नाही. कारण सर्वांनी सत्ता भोगलेली आहे. आता तर पक्षापेक्षाही व्यक्तीला महत्त्व दिले जात आहे. आमचे सरकार तीन पक्षाचे असून तिघांचे वेगवेगळे विचार असले तरी शेतकरी हितासाठी तिघंही पक्ष एकत्र असते. शेतकरी हा विकासाच्या केंद्रबिंदू आहे. दर दोन-तीन महिन्यात कोणती ना कोणती योजना शेतकऱ्यांसाठी हे सरकार आणत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किती संवेदनशील सरकार आहे हे दिसून येत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुख्य यार्डात ई-नाम योजनेअंतर्गत धान्यचाळणी यंत्र, प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एक हजार टनी गोडाऊन, व शेतकरी निवास, अशा विविध कामांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक रोहित निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायक चव्हाण, संचालक घनश्याम पाटील, नंदकिशोर पाटील, विजय पाटील, डॉ अनिल पाटील, सोनाली पाटील ,मिलिंद पाटील, कल्पना पाटील नंदकिशोर धनगर, मनोज सनेर, गोपाल पाटील, रावसाहेब पाटील, किरण देवराज, ॲड. शिवराज पाटील, सुनील अग्रवाल, सुनील जैन, नितीन पाटील, उपसचिव जितेंद्र देशमुख, सचिव रोहिदास सोनवणे उपस्थित होते.
प्रस्ताविकात सभापती नरेंद्र पाटील यांनी विविध विकास काम केले. यापुढेही शेतकऱ्यांसाठी शिवभोजनची व्यवस्था, संपूर्ण मार्केट मध्ये काँक्रिटीकरण हमाल मापाडींसाठी निवास व्यवस्था करणार असल्याचेही त्यांनी सांगितले विरोधक आमची बदनामी करत असतात परंतु विकास कामे आणून आम्ही त्यांचे तोंड बंद केलेले आहे. शेतकरी हिताची कृषी उत्पन्न बाजार समिती होते तर शॉपिंग सेंटर मध्ये दोन दारू दुकानांसाठी का देण्यात आले असा सवालही विरोधकांना नरेंद्र पाटील यांनी केला. शेतकरी हिताच्या असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना शॉपिंग का देण्यात आले नाही यावरही नरेंद्र पाटलांनी जोरदार टीकास्त्र केले कृषी उत्पन्न बाजार समितीला वैभव आणण्यासाठी व्यापारी शेतकरी हमाल मापाडी हे सर्व केंद्रबिंदू आहेत.
यावेळी प्रथम दीप प्रज्वलन करून हमाल मापाडी व्यापारी व शेतकरी यांचे सत्कार समारंभ करण्यात आले.अतिथींचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकांत सोनवणे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की व्यापारी हमाल मापारी शेतकरी एकत्र आले तर मार्केटची उन्नती राहणार नाही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आम्ही आणत आहोत परंतु शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत द्यावे बाहेरच्या बाजार समितीला घेऊन जाऊ नये असा सल्लाही यावेळी दिला. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर देखील जोरदार टीकास्त्र केले.
बाजार समितीने जेसीबी घ्यावे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी निवासस्थानाचे आज उद्घाटन झाले, ही शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त बाब आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला जर जेसीबी घेता आलं तर केळी, शेतरस्ते मोकळे करावे. यातून शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटणार आहे, असेही ना.पाटील म्हणाले.