ना. गुलाबराव पाटील : समाजासाठी दातृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर

समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो, याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करीत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हॉलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी गौराई सेवा देत असून दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शहरातील गिरणा पाण्याच्या टॉकीजवळील असलेल्या पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नूतनीकरण सोहळ्यास उद्घाटक म्हणून ना. गुलाबराव पाटील उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या कोनशीलेचे अनावरण व गौराई हालचे उद्घाटन त्यांच्यासह ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन,  राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. अनिल ढाके, भाजप उपाध्यक्ष रोहित निकम, बांधकाम व्यवसायिक अनिश शहा, माजी नगरसेवक अमर जैन, पृथ्वीराज सोनवणे यासह जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थिती होती.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रध्देय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी माळी दादांच्या विनंती वरून उभा केलेल्या गौराई हॉलची पुनर्रचना केली असून आज पुन्हा सुसज्ज सेवेसह उपलब्ध करून दिला. गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर परिसरात श्री शंकर-पार्वती, श्री. दत्तगुरू, श्री. गणेशाची मूर्ती  व भगवान शंकराची पिंड, नंदी याठिकाणी विराजमान होणार आहेत. तसेच या आवारात बहुउद्देशीय हॉल, खुली व्यायाम शाळा, वाचनालय, किलबिल, बेंचेस अशा अन्य सुविधांसह लोकार्पण झाला आहे. परिसरातील नागरिकांनी जबाबदारीने त्याची देखभाल करावी असे आवाहनही त्यांनी केले.

माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळेंनी सांगितले की, श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांनी 35 वर्षापूर्वी  गौराई हालची निर्मिती केली होती. त्यावेळी मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. अशोकभाऊंच्या सामाजिक दात्वृतातून ते आज घटस्थापनेच्या दिवशी साकार झाले असल्याचे सांगितले.

पार्वतीनगर वासियांच्यावतीने अशोक जैन यांचा हृदय सत्कार

गौराई हालसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगरवासियांतर्फे  अशोकभाऊ जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी गौराई बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष राजीव देशमुख, खजिनदार मोहन बेंडाळे, सदस्य भगवान भंगाळे, शामकांत पाटील, सचिन येवले, संजय दर्यापूरकर, मनोज चौधरी, राजेंद्र सदावर्ते, जयश्री वायकोळे, विद्या चौधरी, निमंत्रित सदस्य डिगंबर पाटील, पी. बी. पाटील, प्रा. एस. एन. भारंबे, गणेश सुरळकर यांच्यासह पार्वतीनगर रहिवासी व जैन इरिगेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक सचिव अनिल जोशी यांनी केले. सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. आभार डॉ. अनिल ढाके यांनी मानले.