नितीन गडकरी यांच्या जीवनावरील चित्रपट ‘या’तारखेला प्रदर्शित होणार

नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव.भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काम करणारे नितीन गडकरी यांची ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे.नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. हा चित्रपट २७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.