निफ्टी पुन्हा 22,000 च्या वर बंद, आयटी आणि फार्मा क्षेत्रात जोरदार खरेदी

शेअर बाजार: आठवड्यातील शेवटचे ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी चांगलेच गेले. शेअर बाजारातील वाढीमुळे बाजार भांडवलही वाढले आहे ऑटो, आयटी आणि फार्मा समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात ही वाढ झाली. निफ्टीने पुन्हा एकदा 22000 चा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 376 अंकांच्या उसळीसह 72,426 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 130 अंकांच्या उसळीसह 22,040 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात आयटी, ऑटो, फार्मा, बँकिंग, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर क्षेत्रातील समभागात तेजी दिसून आली. तेल,वायू आणि ऊर्जा समभागांमध्ये घट झाली आहे. आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स तेजीने बंद झाले. 50 निफ्टी समभागांपैकी 38 समभाग वाढीसह बंद झाले तर 12 समभाग तोट्यासह बंद झाले.

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 389.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.06 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत मार्केट कॅपमध्ये 4.67 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.