शेअर मार्केट: १३ फेब्रुवारी रोजी,मागील ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण पाहिल्यानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्राने भारतीय शेअर बाजाराला दिलासा दिला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात जोरदार तेजी दिसून आली. आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात,बाजार बंद होत सेन्सेक्स ४८२.७० (०.६८%) अंकांनी ७१,५५५.१९ वर आणि निफ्टी १२७.३० (०.५९%) २१, ७४३.३० वर. तर निफ्टी बँक १.४% वाढून ४५५०२. ४० वर बंद
आज हिंदाल्को इंडस्ट्रीज, ग्रासिम इंडस्ट्रीज, बीपीसीएल, डिव्हिस लॅबोरेटरीज आणि अल्ट्राटेक सिमेंट हे निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्याचा व्यवहार करत बंद झाले, तर लाभधारकांमध्ये कोल इंडिया, यूपीएल, ॲक्सिस बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश होता.