पुणे : निलेश लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत प्रकाशन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी निलेश लंके यांचं स्वागत केलं. पण शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी निलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिला का? या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? हे समजणं कठीण होऊन बसलं आहे.
शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी शरद पवारांनी निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेच्या जागेतून उमेदवारी जाहीर करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण याबाबत दोन्ही नेत्यांनी काहीच भाष्य केलं नाही. याउलट आपल्या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली.