निवडणूक आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती, 85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान…..

नवी दिल्ली:  लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. आज आचार संहिता लागू केली जाणार आहे, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी निवडणुकांची घोषणा करण्याआधी यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. पहिल्यांदाच किती मतदार मत देणार आहेत. किती महिला-पुरुष मतदार करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात ९६.८ कोटीहून अधिक मतदार आहेत. देशात १० लाख ५० हजार मतदान केंद्र आहेत. जवळपास ५५ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम निवडणुकीच्या कामासाठी वापरले जाणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १.५ कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडण्याचे काम करत आहेत राजीव कुमार यांनी सांगितलं की, ८०० जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

निवडणूक निष्पक्ष आणि स्वतंत्र होणार आहेत. आतापर्यंतच्या सर्व निवडणुका या शांततेत झाल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मतदानाबाबत कोणतीही माहिती हवी असल्यासं माहिती वेबसाईटवर मिळू शकणार आहे. १.८२ कोटी नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. ८२ लाख प्रौढ मतदार मतदान करतील. ४८ हजार तृतीयपंथी मतदार करतील. ४७.७ पुरुष आणि ४७.१ महिला मतदार मतदान करतील.

१०० वर्षांवरील मतदार २ लाख आहेत. ८२ लाख मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत. १८ ते १९ या वयातील १.८ कोटी तरुण मतदान करतील. 85 पेक्षा जास्त वयाच्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाणार आहे… एकाच वेळी देशात हा प्रयोग आम्ही पहिल्यांदा करत आहोत, असं ते म्हणाले.

एखाद्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला ३ वेळा वृत्तपत्रात माहिती द्यावी लागेल. त्या पक्षाला त्याची माहिती द्यावी लागेल. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांशी मदत घेतली जात आहे. २ वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. हिंसाचारमुक्त निवडणूक राबवणे ही आमची जबाबदारी आहे. निवडणुकीत हिंसेला कोणतंही स्थान नाही. पैशांचा वापर निवडणुकीत होऊ देणार नाही, असं राजीव कुमार म्हणाले.