मॉस्को: रशियन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. विजयानंतर देशाला संबोधित करताना पुतिन यांनी युरोपमधील देशांना तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली. त्याचबरोबर अमेरिकेच्या लोकशाहीचीही खिल्ली उडवली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्या भाषणात पुतिन म्हणाले की, रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो युतीमध्ये शक्यता नाही, असे स्पष्ट केले होते.
यावर पुतिन म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात काहीही शक्य आहे; असे झाले तर तिसरे महायुद्ध दूर नाही. नाटोचे सैन्य अजूनही युक्रेनमध्ये आहेत. युक्रेनमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सचे सैनिक रणांगणावर असल्याची माहिती रशियाकडे आहे. त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट नाही, असा इशारा देत तिसरे महायुद्ध दूर नाही, अशी धमकी त्यांनी दिली. रशिया चर्चेसाठी तयार आहे. संघर्ष झाला, तर याचा अर्थ जग तिसऱ्या महायुद्धापासून फक्त एक पाऊल दूर असेल.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी भविष्यात युक्रेनमध्ये आपले सैन्य उतरवण्याची युक्रेन युद्धावर पुतिन म्हणाले की, फ्रान्स चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. कारण, सर्व काही अद्याप संपलेले नसत्याचे मी यापूर्वीही स्पष्ट केले आहे. आता पुन्हा सांगतो, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, केवळ शत्रूचा दारुगोळा संपल्यामुळे चर्चा होणार नाहीत, असे नको. ही चर्चा गांभीर्याने होणे आवश्यक आहे. शांतता हवी असेल, तर त्यांना शेजारी देशांसारखे चांगले संबंध ठेवावे लागतील.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल व्लादिमिर पुतिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. आगामी वर्षांमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.