निवडणूक निकालापूर्वीच शेअर बाजार कोसळला, निकालामुळे घमासान

लोकसभा निवडणूक २०२४ निकालाचे पडसाद दिवसभर देशातील शेअर बाजारावर दिसतील. जस जसे बहुमताचे चित्र स्पष्ट होईल, तसा मंगळवारी शेअर बाजार रंग दाखवेल. सोमवारी शेअर बाजाराने जोरदार तेजीचे सत्र अनुभवले. आज पण शेअर बाजारात तेजीचे सत्र असण्याची शक्यता आहे. पण शेअर बाजार २२०० अंकांनी कोसळला आहे. सध्या सकाळी ०९:११ वाजता बीएसईमध्ये घसरणीचे सत्र दिसत असले तरी निकालाचे चित्र स्पष्ट होताच निर्देशांक दुडूदुडू धावेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

बाजार उघडताच पाच मिनिटांत स्वाहा

शेअर बाजार उघडताच सुरुवातीच्या पाच मिनिटांत निकालाचे आकाडे पाहून सेन्सेक्स आणि निफ्टीला घाम फुटला. सेन्सेक्स ११०० अंकांपेक्षा अधिकने घसरला. तर दुसऱ्या निर्देशांकाला पण घौडदौड करता आली नाही. एनएसई निफ्टी सकाळीच ३९९.१५ अंकांनी, १.७२ टक्क्यांनी घसरुन २२,८६४ स्तरावर व्यापार करत होता.

निफ्टीचे मजबूत संकेत

निफ्टी चा वायदा सकाळी जवळपास १५० अंकांनी वधारला होता. निफ्टी सकाळी २३,५६० अंकावर पोहचला होता. त्यमुळे आज पण भारतीय बाजार कमाल दाखविण्याची शक्यता आहे. प्री-ओपन सेशनमध्ये बाजाराने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण बाजार उघडताच आणि निकाल हाती येताच चित्र पालटू शकते.

सकाळी निकालसमोर येताच मोठा बदल

गेल्या दोन महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरु आहे. सकाळी ८ वाजेपासून देशभरात मत मोजणी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत. तर काही दिग्गजांना अजून ही मुसंडी मारता आलेली नाही. बाजार आता उघडला आहे. त्यामुळे या सुरुवातीच्या निकालाआधारे बाजार प्रतिक्रिया देईल. पण हे चित्र तळ्यात-मळ्यात असेल. पुढील एक तासात अनेक ठिकाणी आघाडीच्या बातम्या येताच तशी प्रतिक्रिया बाजार देईल. एक दिवसापूर्वी बाजाराने मोठ्या रॅलीचे संकेत दिले आहे.

सेन्सेक्सचा ऑल टाईम रेकॉर्ड

सोमवारी बीएसई सेन्सेक आणि एनएसई निफ्टी दोन्ही निर्देशांकानी नवीन रेकॉर्ड तयार केला. सेन्सेक्सने २,५०७.४७ अंक (३.३९ टक्के) आघाडीसह ७६,४६८.७८ अंकाचा टप्पा गाठला होता. आजही ही दोन्ही निर्देशांक मोठी भरारी घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

निफ्टीची दमदार कामगिरी

एनएसई निफ्टी इंडेक्सने काल २३,२२८.७० अंकांची नवीन उच्चांकी कामगिरी करुन दाखवली. अखेरच्या टप्प्यात निफ्टी ७३३.२० अंक वा ३.२५ टक्क्यांच्या जबरदस्त तेजीसह २३,२६३.९० अंकावर बंद झाला. इतक्या दिवसांच्या व्यापारी सत्रात निफ्टी बँक इंडेक्स पहिल्यांदा ५० हजार अंकांचा टप्पा पार करु शकला.