जळगाव : जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२० अंतर्गत उडीद, मूग, सोयाबीन, मका, तीळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस इ. पिकाचा विमा रक्कम मंजूर झालेली असून या बाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता आज तागायत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली ती नसल्याने शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. एकीकडे 7. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया द गेली आहेत.
सध्याच्या परिस्थितीत बळीराजास 1. आर्थिक मदतीची गरज असून त्याच्या हक्काची नुकसान भरपाई रककम तातडीने देण्यात यावी. अन्यथा येत्या दोन ऑक्टोबर रोजी संबधित पात्र शेतकऱ्यांसोबत उपोषण करावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनीदिला आहे.गेल्या वर्षी नुकसानग्रस्त जळगाव जिल्ह्यातील १०१४० शेतकऱ्यांना रक्कम रु.४,७०,६४,२८०/- मंजूर झालेली असून संबंधित विमा कंपनीमार्फत (भारती एक्स) आजतागायत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित केली नसल्याचे कळाले आहे. खरीप हंगाम २०२१ आता संपुष्टात येत.
असून सन २०२० ची खरीप पिकाची विमा रक्कम आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होणे हे अतिशय खेदजनक व निंदनीय आहे. या संदर्भातील शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावरील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण तात्काळ संबंधित विमा कंपनीस दिनांक २७ सप्टेंबर २०२१ पर्यंत पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे बँक खात्यात विम्याची रक्कम १२% विलंब शुल्कासह जमा करण्याचे आदेश द्यावेत सदरील विम्याची रक्कम या कालावधीत वर्ग न झाल्यास मी संबधित विमाधारक शेतकऱ्यांची समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच दिनांक २ ऑक्टोबर २०२१ पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसेल.तरी आपण तात्काळ या विषयी कारवाई कराल अशी आशा करतो अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.