नूतन मराठा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा..

जळगाव : माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नूतन मराठा महाविद्यालय मराठी विभाग व राष्ट्रीय सेवायोजन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला

या प्रसंगी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. के. बी. पाटील, प्रमुख अतिथी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अविनाश बडगुजर, आयोजिका मराठी विभाग प्रमुख प्रा . ललिता हिंगोणेकर आणि राष्ट्रीय सेवायोजन प्रमुख प्रा. डॉ. राजू पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

पुस्तकाने मस्तक घडते आणि घडलेलं मस्तक कुणाचे हस्तक होऊ शकत नाही. म्हणून वाचन आवश्यक आहे, “वाचाल तरच वाचाल” म्हणून वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा ललिता हिंगोणेकर यांनी आयोजना मागील भुमिका मांडताना आपल्या प्रास्ताविकात नमुद केले.

डाॅ अविनाश बडगुजर यांनी वाचनाचे महत्व आणि वाचनातून घडलेल्या अनन्यसाधारण व्यक्तीमत्वांचा परिचय करून दिला. ग्रंथाविना घराला घरपण येवू शकत नाही म्हणून घरात ग्रंथालय असनं अत्यावश्यक आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

एम ए मराठी द्वितीय वर्षाची विद्यार्थ्यीनी अबोली खंदारे हिने अग्नीपंख या लोकप्रिय ग्रंथातील एक संवाद वाचून दाखविला . प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी सुशिल सोनवणे याने महात्मा फुले यांच्या जीवनचरित्र या पुस्तकातील उतारा वाचून दाखविला एफ.वाय.बी.ए. चा विद्यार्थी मोहीत साळुंके याने अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय सादर केला.

सुत्रसंचलन मराठी विभागाचे प्रा अर्जुन पाटील यांनी केले , आभार प्रदर्शन मराठी विभागाचे प्रा राकेश गोरसे यांनी केले तर प्रसिद्धीची जबाबदारी प्रा घनश्याम पाटील आणि प्रा रत्नाकर कोळी यांनी पार पाडली

या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते