नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न..

 

जळगाव : दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न झाली. वाढती महागाई, बेरोजगारी आणि भविष्यातील वाटचाल या संदर्भात तज्ञ प्रशिक्षक रोहित कुमार मिश्रा यांनी आर्थिक साक्षरता कार्यशाळे दरम्यान प्राध्यापकांशी मुक्त संवाद साधला.यावेळी त्यांनी आपल्या विचारातून स्पष्ट केले कि, सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सुरक्षीत गुंतवणूक ही काळाची गरज आहे म्हणून बचत कुठं आणि कशी करावी या सर्व बाबींवर सांगोपांग चर्चा केली.

सदर कार्यशाळा नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

नूतन मराठा महाविद्यालय आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला जवळपास 80 रजिस्ट्रेशन मिळालेल्या या कार्यशाळेला अध्यक्ष, प्रशिक्षक यांच्यासह उपप्राचार्य डॉ माधूरी पाटील, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ के बी पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते

डाॅ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करुन कार्यशाळेला प्रारंभ झाला

करिअर कट्टाचे समन्वयक प्रा भागवत पाटील यांनी आयोजनामागील भुमिका आपल्या प्रस्ताविकात नमुद केली.

अवाजवी, अनावश्यक खर्च यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटातून अलगद बाहेर पडायचं असेल तर म्युचुअल फंड, पेंशन योजना, सोनं, लाॅंगटर्म योजना असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय सुचवत मुख्य वक्ते तथा प्रशिक्षक रोहित कुमार मिश्रा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख यांनी उपस्थितांना या आर्थिक साक्षरता कार्यशाळेचा लाभ निश्चित होईल असे सांगून सुरक्षित गुंतवणुकीचा योग्य तो पर्याय निवडून भविष्य आणि वर्तमानातील जीवन कसं सुकर करता येईल यासाठी एक परिपक्व मेजवानी या कार्यशाळेतून मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रमुख वक्त्यांचा परिचय वाणिज्य विभागाच्या प्रा. पल्लवी कुलकर्णी यांनी करुन दिला.

सुत्रसंचलन प्रा. भाग्यश्री होले यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. मनिषा पारधी यांनी केले.

प्रसिद्धी प्रा. घनश्याम पाटील आणि प्रा रत्नाकर कोळी यांनी पार पाडली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले, कार्यशाळेला सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होते..