‘नॅन्सी पेलोसी’यांनी घेतली ‘दलाई लामां’ची भेट! अमेरिकी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर चीनचा इशारा

शिमला : दलाई लामा यांची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. या भेटीमुळे चीनला चांगल्याच मिर्च्या झोंबल्या आहेत. चीनने या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दलाई लामा हे पूर्णपणे धार्मिक व्यक्ती नाहीत, असे चीनने म्हटले आहे. धर्माच्या नावाखाली ते चीनविरोधी फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेने दलाई लामांपासून दूर राहावे आणि तिबेटच्या कारभारात हस्तक्षेप करू नये, असे आवाहनही चीनने केले आहे.

आपले सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे चीनने म्हटले आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे अमेरिकन शिष्टमंडळाने दलाई लामा यांची भेट घेतल्यानंतर चीनकडून हा इशारा आला आहे. या शिष्टमंडळात अमेरिकी सिनेटच्या माजी अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांचाही समावेश आहे, ज्यांना चीन आपला सर्वात मोठा शत्रू मानतो.

भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की आम्ही अमेरिकेच्या बाजूने दलाई समूहाच्या चीनविरोधी फुटीरतावादी स्वभावाला पूर्णपणे ओळखण्याची विनंती करतो, शिझांग (तिब्बतचे चीनने केलेले नामकरण)शी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेने चीनशी केलेल्या वचनबद्धतेचा आदर करावा. तिबेटचे नाव, आणि जगाला चुकीचे संदेश पाठवणे थांबवा”

प्रवक्ता पुढे म्हणाले, “शिझांग प्राचीन काळापासून चीनचा एक भाग आहे. शिझांगचे व्यवहार पूर्णपणे चीनचे देशांतर्गत प्रकरण आहेत आणि कोणत्याही बाहेरील हस्तक्षेपाला कधीही परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही शक्ती शिझांगवर नियंत्रण ठेवण्याच्या चीनच्या प्रयत्नांमध्ये हस्तक्षेप करेल. कधीही यशस्वी होणार नाही आम्ही अमेरिकेच्या बाजूने शिझांगला चीनचा भाग म्हणून मान्यता देण्याचे आणि समर्थन न करण्याचे आवाहन करतो. असे चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने आपल्या वक्तव्यात म्हटले.