नोकरीच्या शोधामध्ये तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे सुरक्षा दलात ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु, आताच करा अर्ज

तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे ,रेल्वे सुरक्षा दलात मोठी भरती निघाली असून या भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 15 एप्रिल पासून सुरु झाली आहे. ही भरती कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या पदांसाठी आहे, 14 मे 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

रिक्त पदाचा तपशील :

1) सब इंस्पेक्टर (Sub Inspector) – 452
2) कॉन्स्टेबल (Constable)- 4208

शैक्षणिक पात्रता:
सब इंस्पेक्टर: कोणत्याही शाखेतील पदवी.
कॉन्स्टेबल: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट :
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आली असून सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराचे वय हे 18 ते 28 असणे आवश्यक आहे.
इतकी फी असेल :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवाराला 500 रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमदेवारांना 250 रूपये फीस ही भरावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
Online अर्ज: Apply Online
जाहिरात (Notification):
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा