पंजाब: लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पंजाबमध्ये काँग्रेस दोन भागात विभागली गेल्याच दिसत आहे. चंदीगड येथे होणाऱ्या निवडणूक समितीच्या बैठकीवर सिद्धू यांनी बहिष्कार टाकला असून . सिद्धूने आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या भेटीची माहिती दिली होती. या बैठकीत सिद्धू व्यतिरिक्त महेंद्र केपी, शमशेर सिंग दुल्लो आणि लाल सिंह उपस्थित होते.
पंजाबमध्ये राजकीय कलह शिगेला पोहोचला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांच्यातील राजकीय वाद कोणापासून लपलेला नाही. पक्षात असताना सिद्धू स्वतःच्या सभा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिद्धूच्या जवळच्या दोन नेत्यांना राजा वडिंग यांनी निलंबित केले होते. याच नेत्यांनी मोगा येथे नवज्योतसिंग सिद्धू यांची रॅली आयोजित केली होती. पण राजा वडिंग यांनी समजावून सुद्धा सिद्धू सतत पक्षाच्या बाहेर काम करत आहेत.
लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पंजाब काँग्रेस दोन भागात विभागली गेली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाब काँग्रेस आमनेसामने आले आहेत. आज चंदीगडमध्ये होणाऱ्या निवडणूक समितीच्या बैठकीवर सिद्धू यांनी बहिष्कार टाकला. या बैठकीला हजर राहण्याऐवजी सिद्धू आपल्या घरी (पटियाला) येथेच उपस्थित राहिले. एका बाजूला पंजाब काँग्रेसच्या 31 सदस्यांची निवडणूक समितीची बैठक सुरू होती, तर दुसरीकडे सिद्धू यांनी स्वत:ची स्वतंत्र बैठक घेतली आहे .
सोशल मीडियावर दिली माहिती
सिद्धूने आपल्या सोशल मीडिया हँडलवर भेटीची माहिती दिली.त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या बैठकीत सिद्धू व्यतिरिक्त महेंद्र केपी, शमशेर सिंग दुल्लो आणि लाल सिंह उपस्थित होते. हे तिघेही पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून पंजाब काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. सिद्धू पक्षापासून पूर्णपणे दूर आहेत आणि कोणत्याही सभेला उपस्थित राहत नाहीत, याशिवाय त्यांनी स्वतंत्रपणे चार सभाही घेतल्या आहेत. चंदीगड येथे होणाऱ्या निवडणूक समितीच्या बैठकीत एकीकडे लोकसभेच्या भविष्यातील रणनीतींवर चर्चा होत असतानाच दुसरीकडे पक्षाच्या अशा महत्त्वाच्या बैठकांपासून सिद्धू दूर राहणे हे गंभीर प्रश्न निर्माण करते.