---Advertisement---

पंजाबी ड्रेस फाडत महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

यावल:  फैजपूर शहरातील नम्रता नगर भागातील  35 वर्षीय महिला व तिच्या पतीला एका दाम्पत्याने मारहाण केली व महिलेने परीधान केलेला पंजाबी ड्रेस फाडत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात विनयभंगासह विविध कलमान्वये एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूर शहरात नम्रता नगर आहे.

नम्रता नगरातील रहिवासी 35 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती महिला आपल्या पतीसोबत राहते.  या भागातील रहिवासी सचिन यशवंत पाटील व प्रीती सचिन पाटील या दाम्पत्याने किरकोळ कारणावरून या महिलेशी व तिच्या पतीशी वाद घातला आणि सदर महिलेला व तिच्या पतीला त्यांनी मारहाण केली तसेच महिलेने आपल्या अंगात परिधान केलेला पंजाबी ड्रेसचा कुर्ता फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला व तिचा विनयभंग केला.  याप्रकरणी फैजपूर पोलिसात पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment