---Advertisement---

पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींची तिसऱ्यांदा शपथविधी : भाजप कार्यालयात सत्यनारायणाची पूजा

by team
---Advertisement---

जळगाव : देशात लोकसभेत सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे व नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेत असल्यामुळे भाजपने सत्यनारायण पूजेचा आयोजन करून देवाचे आभार मानले.

भाजप कार्यालय येथे सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा भाजप सरचिटणीस अरविंद देशमुख व शोभा देशमुख या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दीपक शास्त्री बऱ्हाणपूरकर यांनी सत्यनारायण महा कथेचे वाचन केले.

आज शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने जळगावत सत्यनारायणाच्या पूजेच आयोजन करण्यात आले. भाजप कार्यालय केळीचे खांब बांधून व आंब्याच्या पानांच्या माळा बांधून सजविण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण.

नरेंद्र मोदी यांच्या हातून देशाचा आणखी विकास होवो. देशाला महासत्ता बनविण्यासाठी मोदींना देव बळ देवो अस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी घातला देवाला साकडे घातले. लोकसभेप्रमाणे विधानसभेत ही  महाराष्ट्र राज्यात महायुतीला मोठ यश मिळो यासाठी सत्यनारायणाच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देवाला साकड घातल.  त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यात सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करून शपथविधी सोहळ्याचा आनंद व्यक्त केला  शपथविधी सोहळ्याचा अनोखा आनंद व्यक्त करत देवाला साकडं घातलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment