बांगलादेशात सातखीरा जिल्ह्यात श्याम नगर येथील शक्तीपीठ असलेल्या जेशोरेश्वरी काली मंदिरात मोठी चोरी झाली आहे. या शक्तीपीठात स्थापन करण्यात आलेल्या कालीमातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट चोरीला गेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२१ मध्ये हा मुकुट भेट म्हणून दिला होता.
प्रसारमाध्यमांनुसार ही घटना गुरुवारी दि. १० ऑक्टोबर रोजी घडली असून या प्रकरणी मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी यांनी यावर भाष्य केले आहे ते म्हणाले की दिवसभराची पूजा आटोपल्यानंतर त्यांनी दोन वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले. यानंतर मंदिराची स्वच्छता करणारे लोक यावेळी पोहोचले असता त्यांनी मूर्ती कडे पाहिल्यानंतर देवीच्या डोक्यावरील मुकुट गायब झालेले दिसले यामुळे आता स्थानिक हिंदूंच्या मनात संतापाची लाट आहे.
Ladki bahin yoajan : खुशखबर ! ‘लाडकी बहीण’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला चांदीचा मुकुट भेट दिला होता. तो मुकुट सोन्यानं मढवलेला असून. या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीनं मोठं महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारी देशांमधील ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. जेशोरेश्वरीचा अर्थ ‘जशोरे ची देवी’ असं आहे.
पुजारी दिलीप मुखर्जी यांनी संबंधित माहिती पोलिसांना दिली असून आता देवीचा मुकुट चोरणाऱ्यांचा तपास सुरु असल्याची माहिती श्यामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक ताइजूल इस्लाम यांनी दिली. चोराला पकडण्यासाठी आम्ही मंदिराचं सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत तरी अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही दुर्गा पुजा दरम्यान मुकुट चोरीची घटना घडल्याने स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे.