पंतप्रधान मोदींचा तिसऱ्या कार्यकाळातील पहिला विदेश दौरा ; वाचा कोणत्या देशाला देणार भेट

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर गुरुवारी रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदी इटलीला जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वान्ना यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 व्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उद्या अपुलिया, इटलीला भेट देणार आहेत.

मोहन क्वान्ना म्हणाले, ‘हा समिट १४ जून रोजी होणार आहे, ज्यामध्ये भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.’ सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल.

जागतिक नेत्यांशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल

परराष्ट्र सचिव क्वान्ना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांशी भारत आणि ग्लोबल साउथच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्याची संधी मिळेल.