जळगाव : पंतप्रधान मोदी हे युतीचे इंजिन आहेत. मोदी हे पावरफुल इंजिन आहे. या पॉवरफुल इंजिनमध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे. सबका साथ सबका विकासामुळे आपली विकासाची गाडी पुढे जाते. तिकडे काय अवस्था आहे ? राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, शरद पवार मी इंजिन, उद्धव ठाकरे मी इंजिन आहे. या इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का ? शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरीता जागा आहे. सामान्य माणसाकरता जागा नाहीये. यांच्याकरता यांचा परिवाराच दुनिया आहे. मोदी यांच्या करिता हा भारत त्यांचा परिवार आहे. यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे ? शरद पवार बारामतीकडे उडतात. उद्धवजी मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतो. यांचे इंजिन हालतही नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. तसेच पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल, जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदींच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल असा आशावाद व्यक्त केला.