पंतप्रधान मोदींचे आज संसदेत निरोपाचे भाषण

नवी दिल्ली:   संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या दिवशी सभागृहाला संबोधित करणार आहेत. याच दिवशी अयोध्येवर विशेष प्रस्ताव येणार असल्याचे संकेत असून, त्यासाठी सर्व भाजपा खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आधी ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार होते.

मात्र, अधिवेशनाचा कालावधी एका दिवसासाठी वाढवण्यात आला. या शेवटच्या दिवशी काहीतरी मोठी घडामोड घडू शकते, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, भाजपाने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करून सभागृहात उपस्थित राहण्याचा निर्देश दिला आहे. खासदारांनी सभागृहात हजर राहावे शनिवारी राज्यसभेत काही अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या सर्व सदस्यांनी शनिवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असे व्हीपमध्ये म्हटले आहे