दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये होत असलेल्या जी-७ आणि क्वाड बैठकीसाठी परदेश दौर्यावर आहेत. आता पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहचत आहेत. याठिकाणी पापुआ न्यू गिनीचे सरकार पंतप्रधान मोदींचे स्वागत करणार आहे. पापुआ न्यू गिनी सरकार प्रथमच पंतप्रधान मोदींसाठी आपली परंपरा मोडणार आहे.
पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनी येथे विामानतळावर पोहचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात येईल. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे हे त्यांचे स्वागत करतील. या देशात रात्रीच्या वेळी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे सरकारकडून स्वागत केलं जात नाही. परंतु, ही परंपरा मोडून जेम्स मरापे हे मोदी यांचे स्वागतासाठी स्वत: विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. या देशात सूर्यास्तनंतर परदेशी पाहुणा आला तर त्याचे सरकारकडून स्वागत केलं जात नाही. मात्र, पापुआ न्यू गिनीच्या सरकारकडून पंतप्रधान मोदींसाठी ही परंपरा खंडीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे जपान दौर्यावर असून ते हिरोशिमा येथे जी७ आणि क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. यानंतर ते पापुआ न्यू गिनीसाठी रवाना होणार आहेत. पुआ न्यू गिनी येथे रात्री उशिरा पोहचणार आहेत. दुसर्या दिवशी पंतप्रधान मोदी हे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.