पंतप्रधान मोदींनी काश्मीर ला दिली 6400 कोटीची भेट

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते श्रीनगर येथील बक्षी स्टेडियमवरील ‘विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर’ कार्यक्रमत सहभागी झाले. यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधील कृषी आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध ६,४०० कोटींच्या ५३ प्रकल्पांचे लोकार्पण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या ५ हजार कोटीचा कृषी विकास कार्यक्रम देशाला समर्पित केला. तसेच श्रीनगरच्या ‘हजस्तवत श्राइनचा एकात्मिक विकास प्रकल्पासह स्वदेश दर्शन आणि प्रसाद अंतर्गत १,४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे पीएम मोटीच्या हस्ते लोकार्पण झाले.