पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार आज जाहीर होणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसन्या यादीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी सायंकाळी होणार असून, असून, त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणातील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी रविवारी दिली.

गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणातील लोकसभेच्या उमेदवारांबाबत मागील तीन दिवसांपासून भाजपाच्या कोअर ग्रुपच्या बैठका होत आहेत. भाजपा मुख्यालयात शनिवारी रात्री राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेतली.दुसऱ्या यादीत महाराष्ट्राचा समावेश असल्याने राज्यातील जनतेचे विशेष लक्ष लागले आहे. कारण, पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने विरोधकांनी राजकारण सुरू केले होते.

तसेही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा कुठेच समावेश नव्हता. दक्षिणेत पक्षाला बळकट करण्यासाठीभाजपाने आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेदेपा आणि जन सेनेसोबत युती करीत जागावाटप निश्चित केले. आंध्रप्रदेशात भाजपा आठ जागांवर लढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित जागा तेदेपा लढणार आहे. यापूर्वी भाजपाने २ मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १९५ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली होती.

भाजपाच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३४ मंत्र्यांची नावे होती. भाजपाने पहिल्या यादीत उत्तरप्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्यप्रदेशातील २४, गुजरातमधील १५. राजस्थानातील १५, केरळातील १२, तेलंगणातील ९ आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीतील ५. जम्मू-काश्मीर २, उत्तराखंड ३. अरुणाचल २, गोवा १, त्रिपुरा १, अंदमान १. दमण आणि दिवमधील १ जागेवर उमेदवाराची घोषणा केली.